अरबी समुद्रात चक्रीवादळाचे संकेत
June 06, 2023
मॉन्सूनच्या आगमनावर परिणाम होण्याची शक्यता
पुणे : अरबी समुद्राच्या आग्नेय भागात तीव्र कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. या प्रणालीची तीव्रता वाढत आहे. आज (ता. ७) अरबी समुद्रात चक्रीवादळ घोंघावण्याचे संकेत आहेत. हे संभाव्य चक्रीवादळ पश्चिम किनाऱ्याला समांतर उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. यातच मॉन्सूनची वाटचाल 'जैसे थे' आहे. या वादळामुळे त्याच्या आगमनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
थोडक्यात महत्त्वाचे...
- संभाव्य चक्रीवादळामुळे मॉन्सूनची वाटचाल थबकली
- कमी दाब क्षेत्राने केरळजवळील ढग खेचून घेतले
- सध्या मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीस पोषक स्थिती नाही.
उद्यापासून किनारपट्टी लगत वादळी पावसाची शक्यता.
किनाऱ्याला समांतर दिशेने जाणाऱ्या या चक्रीवादळाची तीव्रतादेखील वाढणार आहे. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे अरबी समुद्र खवळून उंच लाटा उसळण्याची शक्यता किनारपट्टीवर वादळी पावसाची शक्यता आहे. ८ ते १० जून आवाहन करण्यात आले आहे. तसेच उद्या (ता. ८) पासून महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगत ताशी ४० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा इशारा आहे. या कालावधीत समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
News Magnet Lite 24 ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/JnIsNIJ9qd46W4k6Dbksut

0 Comments
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किवा कोणत्याही शासनासी संबंधित नाही. कृपया याला official वेबसाईट म्हणून समजू नका. तुमचा काही अभिप्राय असेल तर comments मध्ये नक्की सांगा.