महाकृषि ऊर्जा अभियान – प्रधानमंत्री कुसुम योजना सूचना

तसेच असे निदर्शनास आले आहे की उपरोक्त योजनेअंतर्गत सौर कृषिपंपाचा लाभ घेतलेले शेतकरी सौर कृषिपंप काढून ठेवतात व लाभ घेतला नसल्याचे भासवून दुसरा सौर कृषिपंप महाकृषि ऊर्जा अभियन पीएम- कुसुम घटक-ब योजने अंतर्गत आस्थापित करुन घेतात. अशी बाब निदर्शनास आल्यास त्यांच्याकडील सौर कृषिपंप काढून घेण्यात येईल व त्यांनी भरलेली लाभार्थी हिस्सा रक्कम जप्त करण्यात येईल व अशा शेतकऱ्यांच्या विरुद्ध FIR करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.
महाऊर्जा मार्फत ऑनलाइन पोर्टल सुरू केल्यानंतर त्यास प्रचंड प्रतिसाद प्राप्त झाला असून एकाच वेळी असंख्य शेतकरी अर्ज करण्याच्या प्रयत्नात असल्याने प्रक्रिया होण्यास विलंब होत आहे तरी सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता यावा म्हणून पोर्टलचा दररोज आढावा घेऊन जिल्हानिहाय कोटा वाढवून देण्यात येत आहे. तरी शेतकऱ्यांनी कोटा उपलब्ध नसल्यास, वाट पाहून कोटा उपलब्ध झाल्यावर अर्ज करावा. सौर कृषीपंपाच्या मागणीसाठी नवीन अर्ज करण्याकरीता https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/kusum-yojana component B या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अनुदानावर आधारित या योजनेसाठी अनुसूचित जातीकरीता ३ एचपी पंपासाठी ९ हजार ६९०, ५ एचपी पंपसाठी १३ हजार ४८८ तर ७.५ एचपी पंपासाठी १८ हजार ७२०, अनुसूचित जमातीकरीता ३ एचपी पंपासाठी ९ हजार ६९०, ५ एचपी पंपसाठी १३ हजार ४८८ तर ७.५ एचपी पंपासाठी १८ हजार ७२० तर खुल्या प्रवर्गातील जातीकरीता ३ एचपी पंपासाठी १९ हजार ३८०, ५ एचपी पंपसाठी २६ हजार ९७५ तर ७.५ एचपी पंपासाठी ३७ हजार ४४० रुपये शेतकरी लाभार्थ्यांना भरावयाचा आहे.
News Magnet Lite ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/JnIsNIJ9qd46W4k6Dbksut
0 Comments
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किवा कोणत्याही शासनासी संबंधित नाही. कृपया याला official वेबसाईट म्हणून समजू नका. तुमचा काही अभिप्राय असेल तर comments मध्ये नक्की सांगा.