नागपूर शहरातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. मौद्याकडून रामटेककडे भरधाव वेगात निघालेल्या टिप्परने दुचाकीला जोरदार धडक दिली.

Nagpur : नागपूर शहरातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. मौद्याकडून रामटेककडे भरधाव वेगात निघालेल्या टिप्परने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील काका पुतणीचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी गंभीर किरकोळ जखमी झाली. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. 



शिवदास किसन वंजारी (वय ६० वर्ष) आणि श्रुती भीमराव वंजारी (वय १३ वर्ष) अशी मृत काका-पुतणीची नावे आहेत. तर रेखा वंजारी (वय ५५) असं जखमी झालेल्या महिलेचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कामठी तालुक्यातील भूगांव येथील रहिवासी शिवदास किसन वंजारी आपली पुतणी श्रुती आणि पत्नी रेखा वंजारी यांना घेऊन दुचाकीने मौदा तालुक्यातील नेरला येथे नातेवाईकाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी जात होते.

याचदरम्यान मौद्याकडून रामटेककडे जाणाऱ्या टिप्परने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक (Accident) दिली. ही धडक इतकी भीषण होती की, यामध्ये काका-पुतणीचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने रेखा या दूर फेकल्या गेल्याने त्यांचा जीव वाचला.

पती शिवदास व पुतणी श्रुती यांचा अपघातात जागीच मृत्यू झालेले पाहून शिवदास यांच्या पत्नी रेखा बेशुद्ध झाल्या. त्यांना किरकोळ दुखापत झाल्याने नागपूर येथील मेयो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळ गाठत मृत काका-पुतणीचे मृतदेह ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलिसांनी टिप्पर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटकही केली आहे. काका-पुतणीचा अपघातात मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.


एआरबी ट्रॅव्हल्स आणि कारची समोरासमोर धडक, अपघातात 4 जण ठार >>. Road Accident.

https://newsmagnetlite24.blogspot.com/2023/06/6-road-accident.html

News Magnet Lite 24 ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/JnIsNIJ9qd46W4k6Dbksut