दिनविशेष


05-June-2023



जागतिक पर्यावरण दिन

पर्यावरण दिन कधी सुरू झाला ?

या निमित्ताने सर्व देश वेगवेगळ्या पद्धतीने पर्यावरण जागृती कार्यक्रम आयोजित करतात. 1972 पासून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. संयुक्त राष्ट्र संघाने 5 जून 1972 रोजी पहिला पर्यावरण दिन साजरा केला, तेव्हापासून हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो.

पर्यावरण दिन का बर साजरा करतात ?

जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी 5 जून रोजी जागरुकता वाढवण्यासाठी आणि आपल्या पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी साजरा केला जातो. पर्यावरण संरक्षणाच्या प्रयत्नांमध्ये जगभरातील सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी (UN) नियुक्त केलेला हा दिवस आहे.



  • १९१५ : डेन्मार्कमधे महिलांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला. 
  • १९५९: सिंगापूरमधील पहिल्या सरकारची स्थापना झाली 
  •  १९६८: अमेरिकेच्या अध्यक्षपदचे उमेदवार रॉबर्ट एफ. केनेडी यांचा गोळी मारण्यात आली, पुढील. दिवशी केनेडी मरण पावले.

  • १९७५ : सुएझ कालवा पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. १९६७ पासून ८ वर्षे हा कालवा वापरण्यास मनाई होती.
  • १९७७ : सेशेल्समधे उठाव झाला. 
  • १९८०: भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक व ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे (AITUC) एक संस्थापक नारायण मल्हार जोशी यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीटाचे अनावरण करण्यात आले
  • १९९४: वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराने इंग्लिश कॉटी क्रिकेट स्पर्धेत वॉरविकशायरकडून खेळताना नाबाद ५०१ धावा करून प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये नवीन जागतिक विक्रम प्रस्थापित केला.
  • २००३ : पाकिस्तान आणि भारतामध्ये तीव्र उष्णतेची लाट आल्यामुळे तापमान ५० डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त झाले.
  • १९७४: जागतिक पर्यावरण दिन 

जन्मदिन / जयंती

  • १७२३ : स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्ववेत्ता ॲडम स्मिथ यांचा जन्म. (मृत्यू: १७ जुलै १७९०) 
  • १८७९: भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक नारायण मल्हार जोशी यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे १९५५
  • १८८१:  हार्मोनियम वादक, अभिनेते व संगीतकार, नाट्यसंगीताचे पहिले शिल्पकार, पहिल्या बोलपटाचे संगीत दिग्दर्शक, संगीत क्षेत्रातील पहिले सौंदर्य मीमांसक, संगीतिकांचे प्रवर्तक गोविंदराव
  • १८८१ टेंबे यांचा जन्म. (मृत्यू: ९ ऑक्टोबर १९५५)
  •  १८८३ : ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ जॉन मायनार्ड केन्सयांचा जन्म. (मृत्यू: २१ एप्रिल १९४६)
  • १९०८ : कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया चे सहसंस्थापक रवि नारायण रेड्डी यांचा जन्म. (मृत्यू: ७ सप्टेंबर १९९१)
  • १९४६: विल्यम्स एफ१ टीम चे सहसंस्थापक पॅट्रिक हेड यांचा जन्म.
  • १९६१ : भारतीय टेनिस खेळाडू आणि प्रशिक्षक रमेशकृष्णन यांचा जन्म. 
  • १९७२: भारतीय पुजारी आणि राजकारणी योगी आदित्यनाथ यांचा जन्म मृत्यू/स्मृतीदिन
  • १९५०: कुस्तीगीर व प्रशिक्षक हरिश्चंद्र बिराजदार यांचे निधन. (जन्म: १४ सप्टेंबर २०११)
  • १९७३ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर तथा श्री. गुरुजी यांचे निधन. (जन्म: १९ फेब्रुवारी १९०६) 
  • १९९६: भारतीय कवि आणि विद्वान आचार्य कुबेर नाथ राय यांचे निधन. (जन्म: २६ मार्च १९३३) 
  • १९९९: राजमाता श्रीमंत छत्रपती सुमित्राराजे शाहूमहाराज भोसले यांचे निधन.
  • २००४: अभिनेते आणि अमेरिकेचे ४० वे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांचे निधन. (जन्म: ६ फेब्रुवारी १९११)