दिनविशेष ०४ जुन २०२३


04-June-2023


राष्ट्र सेवादल दिवस, हुतात्मा दिन, विश्व निष्पाप बालक व आक्रमणपीडित दिन



  • १६७४: राज्याभिषेकापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची सुवर्णतुला झाली. ब्रिटिश वकिलातीच्या मते त्यांचे वजन सुमारे ७३ किलो भरले. 
  • १८७६: ट्रान्सकॉटिनेन्टल एक्स्प्रेस रेल्वे अमेरिकेच्या दोन तीरांना जोडणारी ही रेल्वेची 'पहिली प्रवासी खेप होती.

  • १८७८: ऑट्टमन साम्राज्याने सायप्रस युनायटेड किंग्डमच्या हवाली केले.

  • १८९६ : हेन्री फोर्ड यांनी तयार केलेल्या पहिल्या मोटारीचे यशस्वी परीक्षण.

  • १९४४: दुसरे महायुद्ध - दोस्त सैन्याने रोम जिंकले.
  •  १९७० : टोंगाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.

  • १९७९: घानामधे लष्करी उठाव.

  • १९९३ : आय. एन. एस. म्हंसूर या युद्धविनाशिकेचे जलावतरण.

  • १९९४: वेस्टइंडिजच्या ब्रायन लाराचा ८ डावांत ७ शतकांचा नवा विक्रम.
  • १९९४ : गीतकार मजरुह सुलतानपुरी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर. १९९७ : इन्सॅट-२डी या संपूर्ण भारतीय बनावटीच्या उपग्रहाचे फ्रेंच गयानातील कोऊरू येथून यशस्वी प्रक्षेपण झाले.
  • २००१: नेपाळचा शेवटचा राजा ग्यानेंद्र राज्यपदावर.

जन्मदिनाजयंती


  • १७३८ : इंग्लंडचा राजा जॉर्ज (तिसरा) यांचा जन्म. (मृत्यू: २९ जानेवारी १८२०)
  • १९०४: भारतीय प्रकाशक, पर्यावरणवादी भगत पुराण सिंह यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑगस्ट १९९२) १९१०: होव्हक्रफ्ट चे शोधक ख्रिस्तोफर कॉकेरेल्म यांचा जन्म. (मृत्यू: १ जुन १९९९)
  • १९१५: माली देशाचे पहिले अध्यक्ष मालिबो केएटा यांचा जन्म. (मृत्यू: १६ मे १९७७) १९३६ : चित्रपट अभिनेत्री नूतन बहल यांचा जन्म. (मृत्यू: २१ फेब्रुवारी १९९१)
  • १९४६: दाक्षिणात्य चित्रपटातील पार्श्वगायक पद्मश्री व पद्मभूषण एस.पी. बालसुब्रह्मण्यम यांचा जन्म
  • विनोदी अभिनेता अशोक सराफ यांचा जन्म. 
  • १९७४: भारतीय शेफ जॅकब सहाय्या कुमार अरुनी यांचा जन्म. (मृत्यू: ४ नोव्हेंबर २०१२) 
  • १९७५: अमेरिकन अभिनेत्री अँजेलिना जोली यांचा जन्म.
  • १९९०: भूतानची राणी जेत्सुनपेमा वांग्चुक यांचा जन्म.

मृत्यू /स्मृतीदिन

  • १९३२ - धर्मानंद दामोदर कोसंबी, बौद्ध धर्माभ्यासक, पंडित.
  • १९६२ - चार्ल्स विल्यम बीब (चित्रित), अमेरिकन निसर्गतज्ज्ञ.
  • १९९८ - डॉ. अश्विन दासगुप्ता, इतिहासतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ.
  • १९९८ - गोविंद वासुदेव कानिटकर, मराठी साहित्यिक