नागपुर:
JUNE, 4 2023
यंदा महाराष्ट्रात
यंदा महाराष्ट्रात सरासरी ९५ टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे. हा अंदाज कमाल तापमान, सकाळ व दुपारची सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा ताशी वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी या निकषावर आधारित आहे.
जून-जुलै या दोन महिन्यात कमी पाऊस होईल आणि ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात साधारण पाऊस पडेल, कमी दिवसांत अधिक पावसाचेही प्रमाण वाढणार आहे. विदर्भासाठी मात्र गुड न्यूज असून, तिथे शंभर टक्के पावसाचा अंदाज ज्येष्ठ कृषी हवामानशास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रातील हवेच्या दाबामध्ये सतत बदल हाेत आहे. येत्या १० जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार आहे. केरळमध्ये तो दाखल झाल्यावर सतत चार दिवस पाऊस पडला, तर त्याची पुढील वाटचाल चांगली राहील.
शेतकऱ्यांनी अशी पिके घ्यावीत पाऊस कमी असल्याने शेतकऱ्यांनी कमी पावसात येणारी मूग, मटकी, चवळी, घेवडा ही पिके घ्यावी. कमी पावसानंतर हरबरा, करडई हे रब्बी हंगामात घेता येतील.
पेरणी कधी करावी?
अवकाळी पाऊसामुळे अलीकडे पेरणी कधी करावी याबाबत शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न असतात. आता ८ जूनला मान्सून राज्यात दणदणीत आगमन करणार आहे. मात्र असे असले तरी ३ जूनपासूनच राज्यात विविध भागात पाऊस पडणार आहे. मात्र शेतकऱ्यांनी लगेच पेरणीची घाई करू नये असा सल्ला पंजाबराव डंख यांनी दिला आहे. जमिनीत २ वित ओलावा आला कि त्यानंतरच पेरणी करावी असा सल्ला देण्यात आला आहे
News Magnet Lite 24 ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/JnIsNIJ9qd46W4k6Dbksut
(IB) केंद्रीय गुप्तचर विभागात 797 जागांसाठी भरती Latest Job Update

0 Comments
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किवा कोणत्याही शासनासी संबंधित नाही. कृपया याला official वेबसाईट म्हणून समजू नका. तुमचा काही अभिप्राय असेल तर comments मध्ये नक्की सांगा.