IPL विजयानंतर उडाला CSK च्या ऋतुराजच्या लग्नाचा बार; कोणी घेतली 'विकेट' पाहा PHOTO
Ruturaj Gaikwad Wedding : चेन्नई सुपरकिंग्सचा स्टार फलंदाज ऋतुराज गायकवाड अखेर विवाह बंधनात अडकला आहे.
क्रिकेटच्या मैदानावर आपल्या धुवांधर फलंदाजीने चाहत्यांची मनं जिंकणारा भारताचा स्टार क्रिकेटर ऋतुराज गायकवाड अखेर लग्नबंधनात अडकला आहे.
भल्याभल्या बॉलर्सच्या नाकी नऊ आणणाऱ्या ऋतुराजची विकेट मात्र त्याची होणारी पत्नी उत्कर्षा पवार हिने घेतली आहे.
भल्याभल्या बॉलर्सच्या नाकी नऊ आणणाऱ्या ऋतुराजची विकेट मात्र त्याची होणारी पत्नी उत्कर्षा पवार हिने घेतली आहे.
शनिवारी (3 जून) ऋतुराज व उत्कर्षा विवाहबंधनात अडकले असून त्यांनी नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे
ऋतुराज आणि उत्कर्षा यांच्या लग्न सोहळ्यातील नयनरम्य फोटो फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे..
ऋतुराज एरा या इन्स्टाग्राम पेजवरुन ऋतुराजच्या लग्नातील हे फोटो शेअर करण्यात आले आहेत.
ऋतुराजची होणारी पत्नी उत्कर्षा पवार हीदेखील एक क्रिकेटपटू आहे. उत्कर्षा 25 वर्षांची असून तिचं बालपण पुण्यात गेलं आहे. ऋतुराज व उत्कर्षा गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखत असल्याचं सांगितलं जात आहे.
News Magnet Lite 24 ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/JnIsNIJ9qd46W4k6Dbksut
(IB) केंद्रीय गुप्तचर विभागात 797 जागांसाठी भरती Latest Job Update







0 Comments
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किवा कोणत्याही शासनासी संबंधित नाही. कृपया याला official वेबसाईट म्हणून समजू नका. तुमचा काही अभिप्राय असेल तर comments मध्ये नक्की सांगा.