मुलगा, सून सांभाळत नाही; मग हेल्पलाइनवर करा कॉल!
जागृतीचा अभाव : हेल्पलाइनबाबत ज्येष्ठ नागरिकांना माहिती नाही
गडचिरोली : कौटुंबिक समस्यांमुळे ज्येष्ठ नागरिक व्यथित होतात, त्यांना कुटुंबातील सून, मुलगा नातवंडांपासूनही मानसिक, शारीरिक छळ सोसावा लागतो. अशा स्थितीत काय करावे, हा प्रश्न पडतो. त्यासाठी शासनाने हेल्पलाइन उपलब्ध केली आहे. या हेल्पलाइनवर संपर्क साधल्यास समस्येचे संबंधितांकडून केले जाते.
संयुक्त कुटुंबात विविध कारणांवरून भांडणे होतात, तसेच अन्य कारणांवरुनही ज्येष्ठांचा छळ केला जातो. त्याला टोमणे मारणे, मारहाण करणे, अपमानजनक वागणूक 'देणे यासह विविध समस्यांचा सामना करावा लागतो. अशावेळी ज्येष्ठ नागरिक जीवन संपविण्याचाही विचार करतात. यापासून परावृत्त करण्यासाठी त्यांना मदत हवी असते.
ज्येष्ठ नागरिकाना कोणतीही मदत
Help मदतीसाठी १४५६७ हेल्पलाईन
हवी असल्यास त्यांनी १४५६७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, संपर्क केल्यानंतर संबंधितांकडून त्यांना मदत केली जाते.
सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत करा कॉल
ज्येष्ठाच्या मदतीसाठी असलेली ही हेल्पलाइन सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत उपलब्ध असते. या वेळेत ज्येष्ठ नागरिक संपर्क साधून आपल्या विविध समस्या मांडू शकतात. त्यांच्या समस्यांवर योग्य सल्ला दिला जातो.
कौटुंबिक वाद चव्हाट्यावर येण्याची ज्येष्ठांना असते भीती
ज्येष्ठ नागरिकांना संपत्ती तसेच घरातील विविध प्रकरणांसबंधी सून, मुलगा व मुलीच्या रोषाचा सामना करावा लागतो. यातून ज्येष्ठांचा छळ होतो. परंतु पोलिसांत अथवा न्यायालयात गेल्यास वाद चव्हाट्यावर येण्याची भीती असते. पर्यायाने मूकपणे अन्याय सहन केला जातो.
हेल्पलाईनवर या सुविधा मिळतील
ज्येष्ठ नागरिकांना हेल्पलाइनमार्फत माहिती देणे, मार्गदर्शन करणे. भावनिक आधार तसेच प्रत्यक्ष मदत आदी प्रकारची मदत दिली जाते. त्यानुसार सुविधासुद्धा उपलब्ध होतात.
जिल्ह्यातील ज्येष्ठांमध्ये जागृतीचा अभाव
टोल फ्री क्रमांकाबाबत गडचिरोली जिल्ह्यात नागरिकांना फारशी माहिती नसल्याने ते टोल फ्री क्रमांकावर फोन करीत नाहीत. त्यामुळे जिल्हातून अल्प प्रतिसाद आहे.
एकत्र कुटुंब पद्धतीने कोणते फायदे असतात ??
फायदे???
फायदा तोटा व्यवहारात असतो नात्यांमध्ये नाही.
तरीपण एकत्र कुटुंब आणि विभक्त कुटुंब यापैकी कोणते जास्त भारी असे विचारात असाल तर अर्थातच एकत्र कुटुंब..
काय????? का चांगले असे विचारता का?? भरपूर कारणे आहेत… ओळीने सांगते…
- भांडण करायला शेजार्यांची गरज लागत नाही.
- एकाच व्यक्तीला सगळ काम कराव लागत नाही.
- भरपूर लोकांकडून प्रेम मिळते.
- गिफ्ट भरपूर मिळतात.
- दवाखाना किंवा ईतर ठिकाणी बाहेर ठिकाणी फिरायला जाताना एकटे जावे लागत नाही , एकटे थांबावे लागत नाही.
- महत्त्वाचे निर्णय सहसा आज्जी, मोठे काका थोडक्यात सांगायचे झाले तर वरिष्ठ मंडळीच घेतात,
- लहान मुलांवर प्रेम करण्यासाठी बरीच वरिष्ठ मंडळी असते. (आई बाबा, काका काकी, आज्जी बाबा,आत्या इत्यादी इत्यादी).
- खर्च वाटून घेतला जातो म्हणजे एकाच व्यक्ती वर सर्व लोड नसतो.
- सर्व सण , कार्यक्रम सर्वांसोबत साजरे करण्यात वेगळीच मजा असते.
- एकत्र कुटुंबमध्ये राहणाऱ्या व्यक्ती सहसा एकलकोंड्या, स्वमग्न, स्वार्थी , आत्मकेंदी नसतात.
- एकत्र कुटुंबात राहणाऱ्या व्यक्ती एकमेकांनसाठी अडजस्टमेंट/ तडजोड करण्यासाठी कायम तयार असतात.
सध्या तरी एवढेच आठवत आहे … अजून काही नवीन सापडले तर नक्कीच अपडेट करेन.
News Magnet Lite 24 ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.


0 Comments
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किवा कोणत्याही शासनासी संबंधित नाही. कृपया याला official वेबसाईट म्हणून समजू नका. तुमचा काही अभिप्राय असेल तर comments मध्ये नक्की सांगा.