न्यूस माग्नेट 24
June ०६, २०२३
नदी पात्रात मृतदेहाचे सांगाडे दिसू लागले....
गडचिरोली व चंद्रपूर या दोन जिल्ह्यांच्या मधून वाहणाऱ्या जिल्ह्यातील सर्वात मोठ्या वैनगंगा नदी पात्रात मृतदेह दफन विधी तथा अंत्यसंस्कार करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नदी पात्रतील पाणी ओसरल्याने मृतदेहाचे सांगाडे दिसू लागले आहेत. हा प्रकार जिल्हातील सावली तालुक्यात घडला आहे. विशेष म्हणजे या नदीतून शेकडो गावांना पाणी पुरवठा केला जातो.
दफनविधीसाठी आरक्षित केलेल्या जागेमध्ये मृतदेहाचे दफन न करता चक्क नदीपात्रामधील रेतीत मृतदेह दफन करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघळकीस आला आहे. चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्ह्यांच्या सीमेच्या मध्यभागातून वैनगंगा नदी वाहते आहे. पावसाळ्यात ही नदी दोन्ही बाजूला तुडुंब भरून असते. त्यामुळे या नदीचे पात्र दिसत नाही. मात्र उन्हाळ्यात नदी पात्र कोरडे पडलेले असते. दोन्ही बाजूला नदी पात्रात रेती दिसून येते. या नदीच्या पूर्व दिशेच्या काठावर गडचिरोली जिल्ह्याचा गडचिरोली तालुका, तर नदीच्या पश्चिम दिशेच्या काठावर चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुका व्याहाड गाव आहे. सध्या उन्हाळा असल्यामुळे वैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. या नदीच्या पत्रातून दोन्ही जिल्ह्यातील शेकडो गावांना पाणी पुरवठा होतो.
विविध गावांना जलजीवन, जलमिशन, सिंचन प्रकल्पाच्या माध्यमातून इथून पाणीपुरवठा केला जातो. याच भागात गडचिरोली तालुक्याच्या टोकावरील गावातील नागरिक हे मृतदेहाचे अंत्यसंस्कार विधी करताना नदीच्या काठावर आरक्षित केलेल्या जागेवर न करता चक्क नदीपात्रातील रेतीत अडीच फुटाचा खड्ड्या करून त्यात मृतदेहाचे दफन करीत आहेत.
KURKHEDA:- आत्याचा खून करणाऱ्या युवकास सात वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा.
https://newsmagnetlite24.blogspot.com/2023/06/blog-post_5.html
News Magnet Lite 24 ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/JnIsNIJ9qd46W4k6Dbksut

0 تعليقات
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किवा कोणत्याही शासनासी संबंधित नाही. कृपया याला official वेबसाईट म्हणून समजू नका. तुमचा काही अभिप्राय असेल तर comments मध्ये नक्की सांगा.