नागपूर : 

घराला कुलुप लाऊन पत्नीचा वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी मोठ्या मुलाच्या घरी गेलेल्या व्यक्तीच्या घरातील रोख व दागीने असा एकुण १.४७ लाखाचा मुद्देमाल अज्ञात आरोपीने पळविला. ही घटना नवीन कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत १ जूनला सायंकाळी ७.३० ते २ जूनला सकाळी ९.३० वाजेदरम्यान घडली.



कैलास फुलचंद उज्जैनवार (वय ६२, रा. भारत टाऊन, कामठी) हे आपल्या घराला कुलुप लाऊन कुटुंबासह रमानगर गवळीपूरा येथे मोठ्या मुलाच्या घरी पत्नीचा वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी गेले होते. अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून बेडरुममधील लोखंडी आलमारीतून सोन्या- चांदीचे दागीने व रोख २० हजार असा एकुण १ लाख ४७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून नविन कामठी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रविण रंदई यांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे. 


News Magnet Lite 24 ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/JnIsNIJ9qd46W4k6Dbksut


https://newsmagnetlite24.blogspot.com/